
MAHA NEWS 96 : आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकरी व प्रवाशांची सेवा करण्याच्या उद्देशाने पाटस व्यापारी संस्थेच्या वतीने पाटस बसस्थानक परिसरात बिस्किट बॉक्स व थंड पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
या सामाजिक उपक्रमात व्यापारी संस्थेचे पदाधिकारी, सदस्य तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. दिवसभर बसस्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या देऊन त्यांची तहान व भूक भागविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
व्यापारी संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “सेवा हाच आमचा धर्म आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी जपत अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात येतील.”
या उपक्रमामुळे प्रवाशांनी व्यापारी संस्थेचे आभार मानत समाधान व्यक्त केले. उष्ण हवामानात अशा सेवाभावी कार्यामुळे अनेक प्रवाशांना दिलासा मिळाला.

