MAHA NEWS 96:
महाराष्ट्र राज्याचे दिवंगत लोकनेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुढाळे व बारामती येथे एका भव्य राज्यस्तरीय वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बारामती विपश्यना समिती व ‘आम्ही झाडकरी’ सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम यशस्वीपणे पार पडला.या कार्यक्रमाचे उद्घाटन आणि वृक्षारोपण सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री. पुरुषोत्तम जगताप, बारामतीचे नगराध्यक्ष श्री. सचिन शेठ सातव, बारामती पंचायत समितीचे सभापती श्री. किरण तावरे, पुणे जिल्हा परिषद सदस्य श्री. मंगेश भैय्या जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेस बारामतीचे अध्यक्ष श्री. संदीप बांदल यांच्या शुभहस्ते सामूहिक वृक्षारोपणाने करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला बारामती विपश्यना समितीचे अध्यक्ष भारत दत्तात्रय गावडे पाटील यांनी प्रास्ताविक केले. व संस्थेविषयी माहिती दिली या प्रसंगी उपस्थित मान्यवरांसह सामाजिक कार्यकर्ते श्री. पुष्पराज भैय्या जगताप यांनी उपस्थितांना पर्यावरणाचे महत्त्व सांगत मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बारामती नगरपालिका नगराध्यक्ष सचिन शेठ सातव यांनी भूषवले. यावेळी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री. पुरुषोत्तम जगताप व बारामती पंचायत समितीचे सभापती श्री. किरण तावरे यांनी संस्थेच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले व उपस्थितांना दिशादर्शक मार्गदर्शन केले.या सोहळ्यासाठी श्री. लालासो माळशिखरे, श्री. विजयराव सोरटे, लक्ष्मणराव गोफणे, बाळासो घाडगे, मधुकर होले, धोंडीराम पवार, सरपंच जयपाल साळवे, सरपंच रवींद्र घोडे, नवनाथ गावडे, कुशाबा ओवेकर, बाबजी कांबळे तसेच ‘आम्ही झाडकरी’ सासवडचे प्रतिनिधी श्री. मिलिंद भाई गुजर, खुशालसिंह गरूड व त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती. तसेच शिवनगर प्रसारक मंडळ माळेगाव येथील मुढाळे व त्यांच्या टीमचे या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार श्री. शेषराव काळे यांनी मानले. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *