
दौंड तालुक्यातील क्रीडा क्षेत्रासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. श्री. दिलीपशेठ साळुंके यांची शूटिंग बॉल असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या मान्यतेने दौंड तालुका अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीमुळे तालुक्यातील क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विविध क्रीडा उपक्रमांना चालना देत युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या निवडीबद्दल संपत (नाना) भागवत स्पोर्ट्स क्लब व नागेश्वर मित्र मंडळ, पाटस व शिवशंभूराजे प्रतिष्ठान यांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.
👉 क्रीडा क्षेत्रात योगदान देण्यासाठी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!

