संतापजनक!

हडपसर, पुणे येथे एका व्यक्तीला भररस्त्यात बॅंकेचे वसूली एजंट घेरुन मारहाण करतात. रिझर्व्ह बँकेने स्पष्टपणे नमूद केले आहे की –

१. वसुली एजंट कर्जदाराला केवळ सकाळी ७:०० ते संध्याकाळी ७:०० या वेळेतच फोन करू शकतात किंवा भेटू शकतात.

२. एजंटांनी कोणत्याही परिस्थितीत शारीरिक किंवा मानसिक छळ, अपमान किंवा मारहाण करणे हा गंभीर गुन्हा आहे.

  1. कर्जदाराच्या थकबाकीची माहिती त्याच्या शेजाऱ्यांना किंवा मित्रांना देऊन त्याची बदनामी करता येत नाही.
  2. वसुलीसाठी येणाऱ्या व्यक्तीकडे बँकेने दिलेले अधिकृत ओळखपत्र आणि अधिकृत पत्र असणे अनिवार्य आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने देखील स्पष्ट केले आहे की, बँका केवळ गुंडांच्या जोरावर कर्जाची वसुली करू शकत नाहीत.जर बँकेच्या एजंटने कायद्याचे उल्लंघन केले, तर त्यासाठी संबंधित बँकेला जबाबदार धरले जाईल.

या सगळ्या गोष्टी धाब्यावर बसवून हडपसरमध्ये ही मारहाण झाली.राज्यात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही, याबाबत शंका यावी अशी ही घटना आहे. राज्याच्या गृहखात्याने या घटनेची गांभीर्याने नोंद घ्यावी. सदर वसुली एजंटांवर कारवाई झाली पाहिजेच पण संबंधित बॅंकेचीही जबाबदारी टाळता येणार नाही. या बॅंकेवरही योग्य ती कारवाई झाली पाहिजे. या खासगी फायनान्स कंपन्यांच्या मुजोरीला आळा घालणे गरजेचे आहे.

Dr.Amol Kolhe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *