
MAHA NEWS 96: श्रीगोंदा तालुक्यातील अर्जदार सौ. मीराताई शिंदे व सहअर्जदार यांच्या श्रीगोंदा–पेडगाव रोडपासून शेतात जाणाऱ्या जुन्या वहिवाट शेतरस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, मा. तहसीलदार सचिन डोंगरे साहेब यांच्या आदेशानुसार हा रस्ता मंडळ अधिकारी जायभाय साहेब, तलाठी सुदर्शन साळवे, श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या कॉन्स्टेबल व्यवहारे मॅडम यांच्या उपस्थितीत 10 फूट रुंद 250फूट लांबी यशस्वीपणे खुला करण्यात आला.
यावेळी अर्जदार मीराताई शिंदे व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासकीय अधिकारी, वादी–प्रतिवादी आणि ग्रामस्थ यांच्या सकारात्मक सहकार्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न शांततापूर्ण व कायदेशीर मार्गाने निकाली निघाला.
लोकप्रतिनिधी,महसूल,भूमी अभिलेख चळवळीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा शेत शिव पानंद वहिवाट रस्ते मिळत असून, हा न्यायाचा आणि शेतकरी एकतेचा महत्त्वाचा विजय आहे.
या कामासाठी सहकार्य करणारे सर्व प्रशासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन, वादी–प्रतिवादी आणि ग्रामस्थ महसूल भूमी अभिलेख यांचे , महाराष्ट्र राज्य चळवळ यांच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद व आभार.
राज्यातील शेवटच्या शेतकरी बांधवाला त्याच्या शेतापर्यंत दर्जेदार व कायदेशीर रस्ता मिळेपर्यंत आमचा संघर्ष, पाठपुरावा आणि जनजागृती अखंड सुरू राहील.

