
MAHA NEWS 96 : दौंड तालुक्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (शरद पवार) संघटनेत नवीन नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. खि. प्रदीप (भैय्या) शितोळे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (SP) दौंड तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
या नियुक्तीनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रदीप (भैय्या) शितोळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला असून, विद्यार्थी संघटना अधिक बळकट करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी काम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
युवक व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे, संघटन मजबूत करणे आणि पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी ते कार्यरत राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

