रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) व सम्यक तथागत सोशल कल्चरल फाउंडेशन, दौंड शहर व तालुका आयोजित “भीम महोत्सव 2026” निमित्त, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संयुक्त जयंतीच्या औचित्याने आज गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना वह्या व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत 135 विद्यार्थ्यांना नगराध्यक्ष दौंड नगरपरिषद दौंड दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे यांच्या हस्ते व उपनगराध्यक्ष यांच्या हस्ते साहित्याचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी सचिन भाऊ खरात व त्यांच्या टीमच्या वतीने राबविण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून, समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारा आहे.
अशा सामाजिक उपक्रमांमुळे महापुरुषांच्या विचारांचा खरा वारसा पुढे नेण्यास निश्चितच बळ मिळते. असे मत कु.दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे यांनी व्यक्त केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *