पाटस : पाटस हे गाव 30 ते 35 हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. या गावाला कारखाना ग्राम दैवत नागेश्वर मंदिर,मारुती मंदिर,
शाळा, कॉलेज, हॉस्पिटल अशा सर्व सुविधा असलेले गाव या गावाला मोठी बाजारपेठ लाभलेली आहे.
आज संपूर्ण गाव कचऱ्याच्या विळख्यात अडकलेले दिसून येत आहे. संपूर्ण परिसरात कचऱ्याचे ढीग ठिकठिकाणी दिसून येत आहे.
आणि पाटस गावातून ओढा वाहत असून त्यामध्ये अत्यंत कचरा बाटल्या तसेच टाकाऊ पदार्थ टाकलेले दिसून येत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला असून याकडे ग्रामपंचायत कसबे पाटस पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. तरी ग्रामस्थांची मागणी आहे की त्वरित कचरा व्यवस्थापन करून गावाच्या मधून वाहणारा ओढा स्वच्छ करून घेण्यात यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *