Kerala मध्ये आज मोठा राजकीय बदल झाला असून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDF सरकार सत्तेत आले आहे. काँग्रेस नेते V. D. Satheesan यांनी आज तिरुवनंतपुरम येथील सेंट्रल स्टेडियममध्ये केरळच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे तब्बल 10 वर्षांनंतर UDF पुन्हा सत्तेत परतले आहे.

या शपथविधी सोहळ्यास अनेक राष्ट्रीय नेते उपस्थित होते. राहुल गांधी, काँग्रेसचे वरिष्ठ नेते तसेच विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहिले. पावसाचा अंदाज असूनही हजारो कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

UDF आघाडीने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 140 पैकी 102 जागांवर विजय मिळवत डाव्या आघाडीचा पराभव केला. गेल्या दहा वर्षांपासून CPI(M) नेतृत्वाखालील सरकार सत्तेत होते.

मुख्यमंत्री सतीशन यांच्यासोबत 20 मंत्र्यांनीही शपथ घेतली. मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून दोन महिला मंत्र्यांचाही समावेश आहे.

प्रमुख मंत्री

  • Ramesh Chennithala
  • P. K. Kunhalikutty
  • K. Muraleedharan
  • Shibu Baby John
  • A. P. Anil Kumar

मुख्यमंत्री झाल्यानंतर सतीशन सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत काही मोठे निर्णय घेतले. महिलांसाठी मोफत बस प्रवास योजना आणि आशा सेविकांच्या मानधनात ₹3000 वाढ जाहीर करण्यात आली. तसेच अंगणवाडी सेविका आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मानधनातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून काही दिवस अंतर्गत चर्चा आणि नाराजीही दिसून आली होती. वरिष्ठ नेते Ramesh Chennithala यांनी सुरुवातीला नाराजी व्यक्त केली होती, मात्र अखेर पक्ष नेतृत्वाने सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *