
*पाटस आज 11 एप्रिल 2026 रोजी मोठ्या उत्साहात महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
आज सकाळी 9 वाजता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी व्याख्याते ॲड बापूराव भागवत यांच्या कडून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावरती व्याख्यानमाला संपन्न झाली
महात्मा ज्योतिराव फुले जन्मोत्सव आयोजन सावता माळी ग्रुप महात्मा फुले उत्सव समिती तसेच क्रांतीज्योती प्रतिष्ठान यांच्याकडून करण्यात आले.. तसेच पुष्पगुच्छ यांची सजावट करण्यात आली तसेच विद्युत रोषणाई मध्ये संपूर्ण परिसर सजावट करण्यात आला..

