दौंड , तालुका पडवी ग्रामपंचायत पाणीपुरवठा विहिरीच्या पाण्याची पातळी खोलवर गेलेली आहे रामोशी वस्ती गायकवाड मळावा चिकुटमळा नाना मळा पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे ग्रामपंचायत कार्यालय यांच्याकडून टँकर मागणीसाठी प्रस्ताव पंचायत समिती दौंड यांच्याकडे सादर करण्यात आला असून गटविकास अधिकारी व पाणीपुरवठा अधिकारी यांनी या प्रस्तावाची दखल घेतलेली नसून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भर उन्हाळ्यामध्ये विहिरी वरती पाण्यासाठी भटकत राहावे लागत आहे

महिला व जेष्ठ नागरिक व अपंग यांना पिण्याच्या पाण्यापासून अतिशय त्रिव्रता पाणी टंचाई निर्माण झाली असून व शाळेतील लहान मुले उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा हंडा डोक्यावरती घेऊन पाण्यासाठी वन वन भटकत आहेत व रामोशी वस्ती येथील ग्रामस्थांनी दोन दिवसांमध्ये पाणीपुरवठा व टँकर पंचायत समिती यांच्याकडून न मिळाल्यास ग्रामपंचायत कार्यालय वरती हंडा मोर्चा नेण्यात येईल व अन्यथा पंचायत समिती दौंड हंडा मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे शासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन टँकर सुरू करावा व गाई म्हैस व दूध व्यवसाय या पाणीटंचाईमुळे लोकांचे आर्थिक जीवन धोक्यात आलेले आहे ग्रामस्थांची मागणी आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *