
कांजूरमार्ग येथील कचरा डेपोमुळे होणारे प्रदूषण आणि त्याचा कन्नमवार नगर वासियांना होणाऱ्या त्रासाबद्दल आज मंत्रालयातील एकनाथ शिंदे यांच्या दालनात विशेष बैठक पार पडली. या बैठकीत हा त्रास दूर करण्यासाठी काही उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश मुंबई मनपाला देण्यात आले.
कांजूरमार्ग कचरा डेपोमुळे परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास कमी व्हावा यासाठी उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवावी. दुर्गंधी प्रतिरोधक फवारणी वाढवून त्याचे संनियंत्रण करण्यात यावे. कचरा डेपोमध्ये बांबुची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात यावी. रहिवाशी भाग जवळ असलेल्या कचरा डेपोतील क्षेत्रात कचरा प्रक्रिया न करता ती लांब अंतरावर करण्यात यावी. यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात यावे असे निर्देश या बैठकीत दिले.
रहिवाशी भाग कचरा डेपोच्या ज्या क्षेत्राजवळ आहे तेथे खत, आरडीएफ अशा दुर्गंधी येणाऱ्या प्रक्रिया न करता त्या ५०० मीटरपेक्षा जास्त अंतरावरील भागात कराव्यात जेणेकरून रहिवाशांना दुर्गंधी येणार नाही आणि नागरिकांच्या आरोग्याची देखील काळजी घेतली जाईल असेही यावेळी स्पष्ट केले.
या बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, प्रधान सचिव नवीन सोना, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.गोविंदराज, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव जयश्री भोज, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव उपस्थित होते. तर मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि मुंबई महानगर परिसरातील महापालिकांचे आयुक्त दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
🌴🏡 20 लाखात 1 गुंठा NA plot जागेसहीत तयार 1bhk घर 🏡🌴
यवत रेल्वे स्टेशन लगत प्रशस्त लोकवस्ती मध्ये 🏡🌴
📞- 9091 99 2244
आम्ही देत असलेल्या उपलब्ध सोयी सुविधा पुढीलप्रमाणे
▪️ सिमेंट काँक्रिट रोड
▪️ अंडर ग्राउंड इलेक्ट्रिसिटी
▪️ अंतर्गत ड्रेनेज लाईन
▪️ 24 तास पाण्याची सुविधा
▪️ रेल्वे स्टेशन 0 मिनिट अंतरावर
▪️ पुणे-सोलापूर हायवे 2 मिनिट अंतरावर
आणि इतर बऱ्याच सुविधांसह “घरमालकीचा तुमचा प्रवास आमच्यापासून सुरू होतो.”तर आजच आपले घर बुक करा.
📞संपर्क क्रमांक – *9091 99 2244
