
(वय ३३) व चिंगु शिंदाबाद भोसले, दोघे रा. हनुमान वस्ती, काळे वस्ती जवळ, देऊळगाव राजे, ता. दौंड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मे रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.
आरोपी शांताराम चव्हाण याची मुलगी अनामिका शांताराम चव्हाण (वय ९) हिने तिच्या भाऊ याच्या शाळेच्या गुणपत्रिकेवर खाडाखोड केल्याचा राग आरोपीच्या मनात होता. या कारणावरून त्याने संतापाच्या भरात मुलगी अनामिकाच्या गळ्यावर, डोक्याच्या मागील भागावर व गालावर लाकूड कापण्याच्या मशीनच्या फिरत्या पात्याने वार करून तिची हत्या केली.
घटना घडल्यानंतर आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मुलीचा मृतदेह कपड्यात गुंडाळून घराला आग लावल्याचा आरोप आहे. मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला.
या घटनेनंतर आरोपीसोबत राहणारी महिला चिंगु भोसले हिनेही प्रकाराची माहिती कोणालाही सांगू नये असे सांगून घटना पोलिसांपासून लपवण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी दौंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक २८२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम 103(1), 238 व 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अमानुष घटनेमुळे देऊळगाव राजे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.


