
दौंड तालुक्यातील गोपाळवाडी गावच्या परिसरात आई सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा मा शुभांगीताई धायगुडे शिंगटे यांनी राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती मेंढपाळ बांधवांच्या राहूटीच्या ठिकाणी जाऊन जयंती केली साजरी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले मनोगत व्यक्त करताना आई सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा मा शुभांगीताई धायगुडे शिंगटे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या आयुष्यात खुप दुःख सहन करावी लागली त्यांच्या पतीचा मृत्यू झाल्या नंतर सती न जाता आदर्श राज्य कारभार केला हिंदू धर्म जीवंत ठेवण्याचे काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले सर्वात जास्त दुःख त्यांना त्यांच्या जावई यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलीला सती जाण्यापासून रोखता आले नाही हे त्यांच्या जीवनातील खुप मोठे दुःख होते
आई सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा मा शुभांगीताई धायगुडे शिंगटे यांनी सांगितले माझ्या जीवनातील सर्वात जास्त आदर्श कोण असेल तर त्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, माता रमाई आंबेडकर यांच्या नंतर जर कोणी माझा आदर्श कोण असेल तर तो म्हणजे माझा मेंढपाळ बांधव आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मेंढपाळ बांधवांना मिठाई वाटप करण्यात आली

