महाराष्ट्र शासनाच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” अंतर्गत लाभार्थी महिलांच्या सुविधा आणि तक्रारींच्या निवारणासाठी विशेष हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आला आहे. आता योजनेशी संबंधित कोणतीही अडचण, शंका किंवा तक्रार असल्यास महिलांना थेट 181 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधता येणार आहे.

या हेल्पलाईनद्वारे अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणी तसेच इतर सर्व माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. शासनाने महिलांना अधिक सुलभ सेवा मिळावी यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे.

समता एंटरप्रायझेस, बोऱावकेनगर, दौंड येथे देखील या योजनेसंबंधित सर्व ऑनलाइन सेवा उपलब्ध असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *