सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील उक्कडगाव मोतीखान गावच्या शिव रस्त्याची मोजणी चळवळीचे समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांचे मार्गदर्शना खाली सोलापूर जिल्हा समिती सदस्य अनिल नागणे पंढरपूर याचे सातत्यपूर्ण पाठपुराव्याने मा तहसीलदार श्री शेख साहेब यांचे आदेशानुसार
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत मा तलाठी धस भाऊसाहेब आणि मंडल अधिकारी यांनी केलेल्या शेत रस्ते सर्वेक्षणातील शिव रस्त्याची मोजणी आज दि 3 जुन 26 रोजी मा भुमि अभिलेख उप अधिक्षक मा रेश्मा तांबेरे मॅडम याचे शिस्तबद्ध नियोजन पद्धतीने मोजणी अधिकारी श्री गांधी साहेब आणि श्री कांबळे साहेब यांनी काटेकोर पणे शिव सर्वेनंबरचे मोजणी पुर्ण केली
या कामी तलाठी धस भाऊसाहेब मंडल अधिकारी भाऊसाहेब यानी मोलाचे सहकार्य केले सदर मोजणी करत असतांना शिव सर्वे नंबर मधील शेतकरी नानंप्पा मुंढे किशोर पाटील किरण मुळे समाधान मुंढे बाळु मुंढे लक्ष्मण लेकुरवाळे अभि मुळे रवी मुळे नामदेव मुळे माधव मुंडे आणि इतर अनेक रस्ता पिडीत शेतकरी बंधू उपस्थित होतो
सदर मोजणी होत असतांना कोणत्याही प्रकारचा वादविवाद तंटा न होता खेळीमेळीच्या वातावरणात मोजणी निर्विघ्न पणे पार पडली नानंप्पा मुढें यांनी सर्वाचे आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *