
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या इंदापूर येथील दौऱ्यादरम्यान सकल मराठा समाजाच्या समितीच्या वतीने त्यांची भेट घेण्यात आली. यावेळी विविध महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनामध्ये सातारा गॅझेट लवकरात लवकर मंजूर करून त्याची अंमलबजावणी करावी, तसेच मराठा समाजातील कुणबी दाखल्यांबाबत येणाऱ्या अडचणी तातडीने दूर*कराव्यात,अशी मागणी करण्यात आली.गरजू व सामान्य कुटुंबांतील मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लवकरात लवकर कुणबी दाखले मिळावेत, यावरही भर देण्यात आला.
तसेच, आजपर्यंत देण्यात आलेल्या कुणबी दाखल्यांची संपूर्ण नोंद ऑनलाइन प्रणालीमध्ये उपलब्ध करून द्यावी, अशी महत्त्वाची मागणीही करण्यात आली.
यावेळी श्री अरुण काकडे, डॉ. विकास देशमुख,श्री विलास सोमदे, श्री तुषार बागल, श्री धर्मनाथ लावंड, फलटण येथील श्री माऊली दादा सावंत,श्री विक्रम शितोळे,श्री राम सपकाळ,अक्षय तावरे,मंच्धिद्र भोसले,नरेश सकेतेओमकार शिंदे,अनुराग तावरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सर्व मागण्यांवर लवकरात लवकर सकारात्मक व योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असून, पुढील भूमिका लवकरच जाहीर करण्यात येईल, असे सांगितले…. श्री अरुण काकडे मराठा सेवक समन्वयक 🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

