
पाटस: पाटस गावामध्ये अनेक दिवसापासून एम एस ई बी चा सर्व कारभार भोंगळ पद्धतीने चालू असून याकडे लक्ष कोण देणार..
अनेक दिवसापासून सर्वत्र वाडी वस्त्यांमध्ये सायंकाळी सहा ते रात्री 10 लोड शेडिंग एम एस सी बी ने चालू केले असून भर उन्हाळ्यात हे लोड शेडिंग चालू केल्याने सर्वत्र नागरिक हैराण होऊन गेले आहेत.
यामध्ये लहान मुलांचे अतोनात हाल होत असून वाढलेली उष्णता तसेच असलेले मच्छर या कारणाने 6 ते 10 लोड शेडिंग झाल्याकारणाने लहान मुलांचे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत याकडे ग्रामपंचायत कसबे पाटस यांनी यांनी एम एस सी बी सी पत्रव्यवहार करून लाईट सुरळीत करण्यात यावी अशी नागरिकांच्यातून मागणी होत आहे
व्यवस्थित रित्या मिळणारा लाईट पुरवठा अचानक लोड शेडिंग वाढवल्यामुळे पाटस गावावरती कोणी करनी की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
झालेली करनि उतरण्याकरिता लिंबू नारळाचा उतारा करायचा असल्यास ग्रामपंचायत कसबे पाटस यांनी एम एस सी बी कडे तो उतारा करावा व नागरिकांना सुरळीत लाईट देण्यात यावी ही संपूर्ण पाटस करांची मागणी आहे
