अखिल भारतीय ग्राहक पंचायत बारामती व इंदापूर तालुका कार्यकारिणी व महावितरण अधिकारी यांची संयुक्त बैठक परिमंडळ कार्यालय बारामती येथे पार पडली.
यावेळी वीज ग्राहकांच्या समस्या तसेच पुरवठ्यासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
तसेच येणाऱ्या जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होत जनजागृती कार्यक्रम राबविण्याबाबत नियोजन करण्यात आले.
त्याचबरोबर स्मार्ट मीटर, विविध योजनेतून राबविण्यात येणाऱ्या सोलर प्रकल्पांची माहिती घेत परिमंडळातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम राबविण्याबाबत नियोजन करण्यात येईल यांसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्हाध्यक्ष ॲड श्री तुषार झेंडे पाटील, उपाध्यक्ष श्री दिलावर तांबोळी, श्री संजय सोनलकर कार्यकारी अभियंता बारामती श्री गणेश गावडे तसेच बारामती तालुका अध्यक्ष श्री संजीव बोराटे, संघटक श्री सतिश खंडाळे, उपाध्यक्ष श्री प्रशांत जगताप, सचिव श्री महेश पवार, सहकोषाध्यक्ष श्री सचिन चौधर, सदस्य श्री नागेश देशमाने, श्री बाबासाहेब शिंदे व इंदापूर तालुका पदाधिकारी श्री राजाभाऊ निंबाळकर, श्री महेश सपकळ, सौ नाजीया सय्यद व आदि मान्यवर, वीज ग्राहक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *