MAHA NEWS 96: पाटस : पाटस ग्रामपंचायत कसबे पाटस ह्या ग्रामपंचायतीला मोठा महसूल असून या पंचायतीची पहिली निवडणूक जनतेतून सरपंच होणार आहे.

आता ग्रामपंचायतीची निवडणूक महिना दोन महिन्या वरती आल्याकारणाने पाटस परिसरात अनेक उमेदवार सरपंच पदासाठी इच्छुक असून चौका चौकात एकच चर्चा सुरू आहे की सरपंच पदासाठी किती उमेदवार उभा राहणार आणि कोण कोण राहणार याकडे संपूर्ण पाटस परिसराचे लक्ष लागून राहिले आहे.
निवडणुकीत कशाच्या आधारावरती राजकीय समीकरण बांधले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तसेच संपूर्ण पाटस परिसरातील मतदारांना हा प्रश्न पडला आहे की जनतेतून सरपंच निवडणूक मध्ये असलेले सर्व उमेदवार विकास कामासाठी निवडणूक लढवणार का आणखी काही कारणासाठी…

या निवडणुकीनंतर पाटस गावात किती बदल होईल याकडे सर्व मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *