बारामती: ता: 4 : बारामती विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट होताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा पवार गट) च्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांनी अद्भुत पूर्व कामगिरी करत विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे.

मतमोजणीच्या 24 व्या फेरी अखेर उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार सुनेत्रा पवार यांनी तब्बल 2 लाख 18 हजार 930 मतांच्या फरकाने प्रतिस्पर्धीवर मात केली या विजयाने त्यांनी 2019 मधील अजित पवार यांच्या मते अधिक्याचाही विक्रमागे टाकला असल्याचे सांगितले जात आहे या निवडणुकीत विरोधकांना फारसा प्रतिसाद मिळालेल्या दिसत नाही. करुणा मुंडे यांना 125 तर अभिजीत बिचकुले यांना 121 मते मिळाली.

दरम्यान या विजयानंतर पार्थ पवार यांनी माध्यमांशी बोलताना मतदारांचे आभार मानले हा आनंदाचा क्षण असला तरी कुठलाही जल्लोष करू नये आम्ही जनतेसाठी काम करत राहू आचारसंहिता संपल्यानंतर जनता दरबार घेणार असे त्यांनी सांगितले.

विजयानंतर सुनेत्रा पवार यांनी बारामतीचे आभार मानत हा विजय आदरणीय दादांच्या स्मृतींना समर्पित असल्याचे म्हटले. बारामतीच्या विकासाची गती ठेवणे व अजित पवारांचे स्वप्न साकार करणे हेच आमचे ध्येय असे मत सुनिता पवार यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *